नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाने मॅटरनिटी लिव्ह म्हणजेच प्रसुती रजा तीन महिन्यांवरुन सहा महिने केली आहे. बाळ दत्तक घेणाऱ्या महिलेलाही तीन महिन्यांची रजा मिळणार आहे. तसेच महिलांना सुट्टीच्या काळात नोकरीच्या सर्व सुविधा मिळतील, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

 

 

महिलांना 26 आठवड्यांची रजा पहिल्या दोन अपत्यांसाठीच देण्यात येणार आहे. तिसऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त प्रसुतीसाठी रजा हवी असल्यास केवळ 12 आठवडेच रजा मिळणार आहे.

 

 

कामगार मंत्रालय हे विधेयक याच अधिवेशनात संमत करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या संस्थेत 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, अशा सर्व सस्थांना हा नियम लागू असणार आहे. प्रसुती रजा वाढीचं विधेयक संमत झाल्यास देशातील 18 लाख महिला कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.