हुबळीजवळ भीषण अपघात; मुंबईतील 6 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 17 Nov 2018 10:44 AM (IST)
हुबळीजवळच्या राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला असून यामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 10 जखमी झाले आहेत.
बंगळुरु : आज सकाळी कर्नाटकमधील हुबळीजवळच्या राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि ट्रकची धडक झाली यामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 10 जखमी झाले आहेत. मृत प्रवासी मुंबईचे असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईहून कर्नाटकला जाणाऱ्या खासगी बसने हुबळी येथील राष्ट्रीय महामार्ग 63 वर वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.