Emerald Lingam : तामिळनाडू पोलिसांनी तब्बल 500 कोटी रुपयांच्या किंमतीचं मौल्यवान पाचू रत्नाचे (Emerald Lingam)  शिवलिंग (Shivling worth Rs 500 crore) जप्त केलं आहे. तामिळनाडू पोलिसांनी तंजावुर येथील एका लॉकरमधून आठ फुटाचं शिवलिंग जप्त केलं आहे. ज्या व्यक्तीच्या लॉकरमधून शिवलिंग जप्त करण्यात करण्यात आलं, त्याची सध्या चौकशी सुरु आहे. हे शिवलिंग कुठून आलं? याचा शोध सध्या तामिळनाडू पोलीस (Tamil Nadu Police)  घेत आहेत. 


पोलीस अधिकारी जयंत मुरली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गुरुवारी तंजावुर येथील एका लॉकरमधून पाचू रत्नाचे (Emerald Lingam)  शिवलिंग जप्त करण्यात आलं आहे. हे शिवलिंग नेमकं आलं कुठून, याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे. ज्या व्यक्तीच्या लॉकरमधून शिवलिंग जप्त करण्यात आलं, त्याची सध्या चौकशी सुरु आहे. 


बँक लॉकरमध्ये कोट्यवधी रुपयांचे पाचू रत्नाचे शिवलिंग असल्याची माहिती तामिळनाडू पोलिसांना (Tamil Nadu Police) मिळाली होती. त्याआधारावर पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत शिवलिंग ताब्यात घेतलं. तंजावुर येथील एका घरात अनेक प्राचीन मूर्ती ठेवण्यात आल्याचं पोलिसांनी समजलं होतं. पोलिसांनी एन.एस. लिंगमचे मालकाची चौकशी केली. त्यानंतर कारवाई करत पाचू रत्नाचे (Emerald Shivling)  शिवलिंग ताब्यात घेतलं. पोलिसांनी पाचू रत्नाच्या शिवलिंगाबाबत अधिक तपास केला असता त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. हे शिवलिंग 2016 मध्ये नागपट्टिनम जिल्ह्यातील थिरुकुवलाईमधील शिव मंदिरातून (Thirukuvalai Shiva Temple) चोरीला गेले होते. या शिवलिंगाची किंमत तब्बल पाच हजार कोटी रुपये इतकी असल्याचं समोर आलं आहे. 


पाचू (Emerald) रत्नाबद्दल माहिती
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक रत्न एक किंवा दुसऱ्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यापैकी नऊ रत्ने महत्त्वाची मानली जातात. त्यांना नवरत्न म्हणतात. त्यापैकी पाचू हे एक रत्न आहे, ज्याला इंग्रजीत एमराल्ड स्टोन म्हणतात. हे रत्‍न म्हणजे बेरिल या षटकोनी स्फटिक प्रणालीच्या खनिजाचा एक प्रकार आहे. याचा रंग पोपटी किंवा गडद हिरवा असतो.  पाचू हे खनिज बेरिलियम व अ‍ॅल्युमिनियम यांचे मिश्र सिलिकेट आहे. पाचूचे स्फटिक निर्माण होत असताना त्यामध्ये क्रोमियम ऑक्साइडचा अंश मिसळून त्याला हिरवा रंग प्राप्त होतो. पाचूचे स्फटिक हार्नब्लेड शिस्ट जातीच्या खडकांमधील शिरांमध्ये आढळणाऱ्या बायोटाइटमध्ये आढळते.