देशभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे 35 हून अधिक लोक दगावले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही अनेक फळबागांचे आतोनात नुकसान झाले आहे. परंतु नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातलाचा मदत घोषित केली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन म्हटले होते की, "गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीमधून प्रत्येकी 2-2 लाख रुपये भरपाई म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जखमींना 50-50 हजार रुपये भरपाई म्हणून देण्याची घोषणा केली."
VIDEO | यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा स्कायमेटचा अंदाज | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
पीएमओ कार्यालयाचे ट्वीट पाहा
त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरद्वारे मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मोदीजी तुम्ही केवळ गुजरातचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशात वादळ, मुसळधार पाऊस आणि वीजेमुळे 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु तुमची संवेदना केवळ गुजरातसाठीच आहे. मध्यप्रदेशात तुमचे सरकार नाही, परंतु या राज्यातदेखील माणसंच राहतात."
VIDEO | 2019-20 या वर्षात दुष्काळ पडणार नाही : स्कायमेट | नवी दिल्ली | एबीपी माझा
कमलनाथ यांचे ट्वीट
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राजस्थानमध्ये 9 जण मृत्युमुखी पडले आहेत, तर मध्य प्रदेशात पावसाने 15 जणांचा बळी घेतला आहे. तसेच दिल्लीत एक, बिहारमध्ये एक आणि गुजरातमध्ये 9 जण दगावले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये हवामान खात्याने वादळाचा अलर्ट जारी केला आहे.