मुंबई : फोर्ब्ज मासिकाच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानींनी सलग बाराव्या वर्षी पहिल्या स्थान कायम राखलं आहे. तर आठ अंकांच्या भरारीसह गौतम अडाणी हे यंदाचे दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. विशेष म्हणजे या यादीत सामील असलेल्या पाच सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी तीन जण गुजराती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 51.4 अब्ज डॉलर (3.5 लाख कोटी रुपये) आहे. तर गौतम अडाणी यांची एकूण संपत्ती 15.7 अब्ज डॉलर (1.10 लाख कोटी रुपये) आहे.
चार गुजरातींची एकूण संपत्ती 7 लाख कोटी
सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये तीन गुजराती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 81.9 अब्ज डॉलर (5.62 लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानींचे वडील गुजरातच्या चोरवाडमध्ये राहत होते. त्यांनी रिफायनरी, टेलिकॉमचा व्यवसाय केला. मुकेश अंबानींनी जिओद्वारे टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांना 28,000 कोटी रुपयांचा नफा झाला.
कोटक यांचा कपाशीपासून बँकिंगपर्यंतचा प्रवास
महिंद्रा बँकेचे उदय कोटक या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 14.8 अब्ज डॉलर (1.02 लाख कोटी रुपये) एवढी आहे. कपाशीचा व्यवसाय करणारे, गुजराती कुटुंबातील उदय कोटक यांनी 1980 मध्ये एका फायनान्शिअल फर्मची स्थापना केली, जी आज कोटक महिंद्रा बँक म्हणून ओळखली जाते.
यंदा यादीत सहा नवे चेहरे
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, 'यंदा या यादीत सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये वेगाने वाढणारी अॅडटेक कंपनी बैजूचे संस्थापक बैजू रवींद्रन, हल्दीराम स्नॅक्सचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, बाथरुम फिटिंग्स जॅग्वाआर ब्रॅण्डचे मालक राजेश मेहरा हे आहेत.'
देशातील सर्वात पाच श्रीमंतांमध्ये तीन गुजराती, टॉप 10 श्रीमंत भारतीयांची यादी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Oct 2019 12:41 PM (IST)
सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये तीन गुजराती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 81.9 अब्ज डॉलर (5.62 लाख कोटी रुपये) आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -