अगदी काही फुटांवरचीही वस्तू देखील दिसत नसल्यामुळे पायी चालणंही अवघड बनलं होतं. धुक्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली असताना मागून येणाऱ्या एका गाडीने धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ येणारी वाहनंही समोरचं काहीही दिसत नसल्याने पुढच्या वाहनांवर धडकली.
दरम्यान, सध्या जखमींना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. पुढचे काही तास महामार्गावरचं धुकं कायम राहिल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे धुक्यात वाहनं सावकाशपणे चालवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.