On This Day In History : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी बलूनमधून 1000 मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या सहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला तसेच चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले. देशात पंडित नेहरुंनी भाक्रा नांगल धरण लोकार्पित केलं. लेखक ना.सी.फडके, अभिनेते अजित खान, भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला होता. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


1797 : बलूनमधून 1000 मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या सहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला. गार्नेरिनचा जन्म पॅरिसमध्ये झाला होता. 18 ऑगस्ट, 1823 रोजी, वयाच्या 54 व्या वर्षी, गार्नेरिन नवीन फुग्याची निर्मिती करत होते. त्या निर्मिती स्थळी फिरत असताना त्यांची धडक एका बीमला धडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 


1927 : निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले. निकोला टेस्ला हे मूळचा सर्बियाचे भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अशा वैज्ञानिकांपैकी एक होता.


 जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार


1938 : चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले. 8 फेब्रुवारी 1906  रोजी जन्मलेले चेस्टर फ्लॉइड कार्लसन.  एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक होते. कार्लसनने इलेक्ट्रोफोटोग्राफीचा शोध लावला, ही प्रक्रिया जगभरातील लाखो फोटोकॉपीर्सद्वारे वापरली जाते. कार्लसनच्या शोधामुळे फोटोस्टॅट प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या ओल्या प्रतींच्या उलट प्रत तयार केली गेली. कार्लसनच्या प्रक्रियेला झेरोग्राफी असे नाव देण्यात आले. 19 सप्टेंबर 1968 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 22 ऑक्टोबर 1938 रोजी, पहिल्या मायक्रोस्कोप स्लाइडची कॉपी केल्याच्या दहा वर्षानंतर हॅलॉइड कंपनीने झेरोग्राफीची पहिली सार्वजनिक घोषणा केली.


भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण 


1963 : पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले. 1958-59 मध्ये भाक्रा धरणातून कालव्यांद्वारे पंजाब आणि राजस्थान राज्यांच्या काही भागास पाणीपुरवठा होऊ लागला. हा 236 कोटी रुपये खर्चाचा संपूर्ण प्रकल्प 1963 मध्ये पूर्ण होऊन 22 ऑक्टोबर 1963 रोजी पंडित नेहरुंच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला.


भारताकडून पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण


2008 : भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले. चंद्रयान 1 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान. चंद्रयान 1  हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण 22 ऑक्टोबर 2088 रोजी रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर 8 रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. 


1900 :  आज भारतीय क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांची जयंती आहे. अशफ़ाक उल्ला खान हे भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांडमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि 19 डिसेंबर सन 1927 ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते.


1942: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचा जन्म


1988 :  बॉलिवूड अभिनेत्री  परिणीती चोप्राचा वाढदिवस. परिणीतीचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी झाला होता. परिणीती ही अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहिण आहे. परिणीतीने मॅनचेस्टर स्कूल ऑफ बिझनेस, फायनॅन्स मध्ये डिग्री घेतली. त्यानंतर तिने काही काळ नोकरीही केली. 2011 मध्ये आलेला 'लेडीज वर्सेज रिकी बहल' या चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती

1917 : इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचा मृत्यू

1933: थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा मृत्यू

ना.सी. फडके यांचा मृत्यू


1978 : नारायण सीताराम फडके यांचा मृत्यू. ना.सी. फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.1949 मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडके यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा आणि डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत.  

1998: हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1998 रोजी झाला होता. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1922  रोजी झाला होता. 

2000: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचा मृत्यू

2014 : भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचा मृत्यू