UPSC टॉपर टीना आणि अतहर लवकरच बोहल्यावर
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2016 04:19 PM (IST)
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली येणारी टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर आमीर-उल-शफी खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यूपीएससी टॉप टीना दाबी म्हणाली की, "दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तारीख अजून ठरलेली नाही. मात्र दोघे लवकरच साखरपुडा करणार आहोत." ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी आमची भेट झाली. त्याच्यासाठी पहिल्याच नजरेत प्रेम झालं होतं, असं टीना दाबीने सांगितलं. अतहर फारच चांगला माणूस आहे. अतहरच्या चिकाटीसाठी त्याचे नेहमीच आभार मानते, असंही ती म्हणाली.