नोएडा : आयकर विभागाने नोएडा सेक्टर 51 येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेवर छापा टाकला. यामध्ये 20 बनावट कंपन्यांच्या खात्यांतून 60 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम ही बनावट खात्यांमध्ये होती. यामध्ये शेतकरी, कामगारांच्या नावांवर खाती उघडण्यात आली होती, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर एका सराफाने 600 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री केली होती. या सराफाचं खातं देखील याच बँकेत असल्याचं आयकर विभागाच्या निदर्शनास आलं होतं.

दरम्यान आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर बँकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पत्रकार आणि फोटोग्राफर्ससोबत गैरवर्तन केलं. मात्र बँक व्यवस्थापकाने याबद्दल माफीही मागितली.

संबंधित बातम्या :

तब्बल 40 कोटींचा गैरव्यवहार, एक्सिस बँकेच्या दोन व्यवस्थापकांना अटक


अवैध नोटाबदलीप्रकरण, एक्सिस बँकेच्या तब्बल 19 कर्मचाऱ्यांचं निलंबन