नवी दिल्ली : 'जलीकट्टू'च्या खेळात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतल्या पुदूर गावात ही दुर्घटना घडली. शिवाय, या घटनेत 70 जण जखमी झाले आहेत.


पोंगल सणानिमित्त तामिळनाडूसह इतर राज्यात हा पारंपरिक खेळ खेळला जातो. या खेळात वळूला वश करायचं असतं. मात्र, हा खेळ अनेकांच्या जीवावर बेतत असल्यानं यावर लादलेल्या बंदीनं मोठा वादही तयार झाला होता.

काय आहे जलीकट्टू?

जलीकट्टू हा तामिळनाडूतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. पीकं कापणीच्यावेळी हा खेळ खेळला जातो. यामध्ये 300-400 किलोच्या बैल/सांड यांच्या शिंगांना नोटा बांधल्या जातात. त्यानंतर बैलाला भुजवून चिडवलं जातं आणि गर्दीत सोडून देतात. या खेळात भाग घेणाऱ्यांनी त्या बैलांची शिंगं पकडून त्याला शांत करायचं असतं.