West Bengal Road Accident: पश्चिम बंगालच्या नादिया (Nadia) जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झालाय. तर, 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. ही घटना हंसखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तर 24 परगणामधील बगदा येथून 20 हून अधिक लोक मृतदेह घेऊन मॅटाडोर येथील नवदीप स्मशानभूमीकडे जात असताना ही घटना घडली. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलबारी परिसरात रस्त्याच्या कडेला एक दगडांनी भरलेली ट्रक उभी होती. या ट्रकला मॅटाडोरनं धडक दिली. या अपघातात 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर, 5 जण जखमी झाले. जखमींवर शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्यानं हा अपघात घडल्याचे सांगितलं जातंय. याप्रकरणी हंसखली पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेवर नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केलंय.
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात झालेला रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय.
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी या अपघातावर शोक व्यक्त केलाय. नादिया जिल्ह्यात, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय तर, 5 जण जखमी झाले. ही बातमी ऐकून मला खूप दुःख झालंय. मृतांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत, असं ट्विट त्यांनी केलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्यानं हा अपघात झाला. या प्रकरणाच्या पोलीस तपास करीत आहेत. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-