यानंतर केरळमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मृत तरुण हा चोर नसून मानसिक रुग्ण होता त्यामुळे मुलाचा जीव घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी मृत तरुणाच्या आईने केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 16 लोकांना अटक केली असून केंद्र सरकारने यासंबंधी केरळ सरकारकडून अहवालही मागवला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे केरळमधील राजकारणही बरंच तापलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी केरळ सरकारने मृत तरुणाच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत मृताच्या कुटुंबीयांपर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी दिले आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपने अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु केली आहेत.