नवी दिल्ली : बेबी डायपरमधून 16 किलो सोनं लपवून घेऊन जाणाऱ्या दोन दाम्पत्यांना दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या चौघे दुबईहून दिल्लीला येत होते. पोलिस या चौघांची चौकशी करत आहेत.
दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर पोलिसांनी 16 किलो सोन्याची बिस्किटं जप्त केली. दोन दाम्पत्य हे सोनं घेऊन जात होत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे एक-एक बाळही होतं.
ही दोन्ही दाम्पत्य गुजरातमधील सूरतचे रहिवासी आहेत. सोन्याच्या तस्करीमध्ये त्यांनी जी पद्धत अवलंबली, ती पाहून विमानतळावरील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. आरोपींनी बेबी डायपरमध्ये 16 किलो सोनं लपवलं होतं. विमानतळावर तपासादरम्यान अधिकाऱ्यांना ही बाब समजली.
नोटाबंदीनंतर नव्या-जुन्या नोटांसह ठिकठिकाणी सोनंही जप्त होत आहे. काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं आहे. त्यामुळे सोनं जप्त केल्यानंतर विमानतळावर चौकशी आणि तपास अधिक कडेकोट करण्यात आला आहे. जाणाऱ्या-येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. याशिवाय गुप्तचर विभागही सतर्क झाला आहे.