Crime News: गुजरातमध्ये एक (Gujrat Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस चौकशीदरम्यान एका १५ वर्षीय मुलाने दिलेल्या कबुलीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने प्रथम त्याच्या मोठ्या भावाला मारहाण (Gujrat Crime News)करून ठार मारले आणि नंतर त्याच्या घाबरलेल्या गर्भवती वहिनीवर बलात्कार (Gujrat Crime News)केला. त्यानंतर त्याने त्याच्या वहिनीची देखील निर्घृण हत्या केली आहे. ही घटना जुनागढ शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात घडली. हे कुटुंब मूळचे बिहारचे आहे.(Gujrat Crime News)

Continues below advertisement

Gujrat Crime News: भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारले

ही धक्कादायक घटना १६ ऑक्टोबर रोजी घडला आणि शुक्रवारी मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. बिहारमध्ये राहणाऱ्या मृत महिलेच्या पालकांनी विसावदर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा हा खून उघडकीस आला. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की आरोपी मुलगा एका डेअरीमध्ये काम करत होता. तो त्याच्या मोठ्या भावावर खूप रागावला होता, त्याचा भाऊ त्याला मारहाण करत होता आणि त्याचे पैसे हिसकावून घेत होता असं कथित कारण रागाचं सांगितलं जात आहे. आरोपीने पोलिसांना कबूल केले की त्याने त्याच्या भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारले आणि तो मरेपर्यंत मारला.

Gujrat Crime News:  लैंगिक संबंध ठेवले तर सोडून देईल

जेव्हा त्याच्या वहिनीने तिच्या पतीचा खून करणाऱ्या दिराचे हे रूप पाहिले तेव्हा ती घाबरली. तिने त्याच्या जीव वाचवण्यासाठी विनवणी केली. त्यानंतर दिराने सांगितले की जर तिने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले तर तो तिला सोडून देईल. ती सहा महिन्यांची गर्भवती असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण, नंतर त्याला वाटले की ती सर्व घटना लोकांना सांगेल आणि त्याचं सत्य उघडकीस आणेल. त्याने तिच्या पोटात गुडघ्याने वार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. त्याने तिच्या पोटावर इतक्या क्रूरपणे वार केले की तिच्या पोटातील भ्रूण गर्भाशयातून बाहेर पडले.

Continues below advertisement

Gujrat Crime News: आईने धाकट्या मुलाला मृतदेह पुरण्यास मदत केली

पोलिसांनी मुलाच्या आईलाही अटक केली आहे, जिने तिच्या धाकट्या मुलाला मृतदेह पुरण्यास मदत केली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले तेव्हा ते नग्न होते. पुरूष पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर महिलेच्या अंगावरतीही कपडे नव्हते. तिची प्रसूती झाली होती. मृतदेह पाच फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आले होते आणि कपडे जाळण्यात आले होते. गुन्ह्याच्या वेळी आरोपीची आई देखील उपस्थित होती असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Gujrat Crime News: अपघातात मृत्यू झाल्याचा दावा 

आरोपीने त्याच्या वहिनीवरती बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. याची पुष्टी करण्यासाठी पोलिस वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. मृत महिलेच्या पालकांनी जेव्हा तिच्या सासूशी संपर्क तुटल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी तिचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला. जेव्हा त्यांनी अपघाताचे फोटो मागितले तेव्हा तो वेगवेगळे बहाणे करू लागला. संशय आल्याने कुटुंबातील काही सदस्यांनी बिहारमधील खगारिया येथून विसावदरला प्रवास केला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की हिंमतनगर पोलिस स्टेशन परिसरात असा कोणताही अपघात घडला नाही. यानंतर पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या आईची चौकशी केली तेव्हा संपूर्ण सत्य बाहेर आले.