Bus Collapse in Uttarakhand: उत्तराखंडच्या चम्पावतमध्ये लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जाणारी गाडी दरीत कोसळून दुर्घटना घडली. यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी झाले आहेत. जवळच्याच गावातील विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर घरी परतणाऱ्यांवर काळानं घाला घातला आहे. सध्या बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.  उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील सुखीढांग-डांडामिनार मार्गावर पहाटे  हा अपघात झाला.   


कुमाऊंचे डीआयजी नीलेश आनंद भरणे यांनी सांगितलं की, सुखीढांग रीठा साहिब रोडवर पहाटे हा अपघात झाला. शिकारमधील लोक लग्नसमारोहावरुन परतत होते.






पंतप्रधान  कार्यालयानं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, उत्तराखंडमधील चंपावतची घटना   हृदयविदारक आहे. यात ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराप्रती शोक संवेदना व्यक्त करतो.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेतील जखमींना 50-50 हजारांची मदत दिली जाईल.





महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha