गुजरात लायन्स ! अमरेली हायवेवर 12 सिंहांचा ठिय्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2017 12:23 PM (IST)
अहमदाबाद (गुजरात) : शेतकरी, व्यापारी अनेक सामाजिक संघटना आपल्या मागण्यांसाठी रास्तारोको करतात. पण कधी सिंहांनी रास्तारोको केलेला तुम्ही पाहिला नसेल! मात्र, गुजरातमधील अमरेली राजुला महामार्गावर अशी घटना पाहायला मिळाली. अमरेली राजुला महामार्गावर काल (15 एप्रिल) रात्री 10 च्या सुमारास अचानकपणे 12 सिंहांनी ठाण मांडलं आणि बघता-बघता महामार्गावरच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली. रस्त्याच्या मध्यभागीच हे सिंह बराच वेळ असल्यानं तब्बल 20 मिनिटं या मार्गावरची वाहतूक बंद होती. महामार्गावर अडकलेल्या काही लोकांनीच हा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. पाहा व्हिडीओ :