On This Day In History : बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद याचा जन्म 11 डिसेंबर  1969 रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचाही जन्म 1922 मध्ये 11 डिसेंबर रोजी झाला होता. आचार्य रजनीश 'ओशो' यांचा जन्मदिवस  आहे. 11 डिसेंबर 1931 रोजी त्यांचा जन्म झाला. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी बंगालमध्ये (आता पश्चिम बंगाल) झाला. याबरोबरच साहित्याचे नोबेल पारितोषिक जिंकणारे इजिप्शियन कादंबरीकार नजीब महफूज यांचाही जन्म 11 डिसेंबर रोजी झाला.   आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.



1845 : पहिले अँग्लो-शीख युद्धाची सुरूवात 


पहिले अँग्लो-शीख युद्ध पंजाबचे शीख राज्य आणि ब्रिटिश यांच्यात 1845-46 मध्ये लढले गेले. या युद्धानंतर शीख राज्याचा काही भाग ब्रिटिश राजवटीचा भाग बनला. पहिल्या शीख युद्धाची पहिली लढाई  18 डिसेंबर 1845 रोजी मुडकी येथे झाली. 



1911 : इजिप्शियन कादंबरीकार नजीब महफूज यांचा जन्म 


इजिप्शियन कादंबरीकार नजीब महफूज यांचा जन्म  11 डिसेंबर 1911 रोजी झाला. साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे ते पहिले अरबी लेखक होते. 


1922 :  अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म 


हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला.  भारतीय चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार हे एक उत्तम लोकप्रिय अभिनेते होते.  जन्मतः त्यांचे नाव मोहम्मद युसूफ खान होते. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून दिलीप कुमार ठेवले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत 5 दशकांची प्रदीर्घ कारकीर्द गाजवली. 7 जुलै 2021 रोजी त्यांचे निधन झाले. 


1931 : अध्यात्मिक गुरू रजनीश यांचा जन्म 


अध्यात्मिक गुरू रजनीश उर्फ ओशो यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी झाला. रजनीश त्यांच्या अनुयायांमध्ये आचार्य रजनीश आणि ओशो म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे खरे नाव चंद्र मोहन जैन होते. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी 1960 च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली.  
1935 : पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी का जन्म।


1935 : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म


भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी बंगालमध्ये (आता पश्चिम बंगाल) झाला. ते भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. मुखर्जी यांनी 2012 ते जुलै 2017 या कालावधीत राष्ट्रपतीपद भूषवले होते.


1936 :  ब्रिटनचा राजा एडवर्ड आठवा याने स्वेच्छेने राजे पदाचा त्याग केला 


घटस्फोटित अमेरिकन महिलेशी लग्न करण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने ब्रिटनचा राजा एडवर्ड आठवा याने स्वेच्छेने राजे पदाचा त्याग केला.


 1941 : जर्मनी आणि इटलीने अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले 


जर्मनी आणि इटलीने 11 डिसेंबर 1941 रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले. इटलीचा शासक बेनिटो मुसोलिनी याने प्रथम युद्धाची घोषणा केली. त्यानंतर  जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याने युद्धाची घोषणा केली.


1946 : युनिसेफची स्थापना 


युनायटेड नेशन्स अंतर्गत मुलांचे शिक्षण, आरोग्य, कल्याण आणि पोषण यासाठी युनिसेफची स्थापना करण्यात आली.


1946 : राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली


9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभागृहात झाली. याला आताचा संसद भवन सेंट्रल हॉल म्हटले जाते. संविधान सभेला संबोधित करणारे पहिली व्यक्ती जे. बी. कृपलानी होते. तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती.  त्यानंतर  11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून हरेंद्र कुमार मुखर्जी आणि घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड करण्यात आली. 


1967 : कोयना येथे भीषण भूकंप


कोयना येथे 11 डिसेंबर 1967 रोजी 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात जवळपास  180 जण ठार झाले होते. तर  तब्बल दीड हजा लोक जखमी झाले होते. या अपघातात  मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. 


1972 : अपोलो मोहिमेतील अपोलो 17 हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले 


अपोलो मोहिमेतील अपोलो 17 हे सहावे चांद्रयान 11 डिसेंबर 1972 रोजी चंद्रावर उतरले. 


1969 : बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचा जन्म


बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी झाला,  त्याने 2000, 2007, 2008, 2010 आणि 2012 मध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती.


2006 : अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.


अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर आजच्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2006 रोजी पोहोचली.