अहमदाबाद : गुजरातमध्ये 10 ते 12 संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यानंतर गुप्तचर यंत्रणांनी गुजरातमध्ये हायअलर्ट जारी केला आहे.
द्वारकेचे जगत मंदिर आणि सोमनाथ मंदिरासह हे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असून या मंदिरांसह इतर महत्त्वाच्या मंदिरांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने हे दहशतवादी पाठवल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या पोरबंदरजवळ भारतीय तटरक्षक दलाने एक संशयास्पद बोट पकडली होती. या बोटमधील 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं.