चेन्नई : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्या चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियानं 50 षटकांत आठ विकेट्स गमावक 288 धावांची मजल मारली आहे. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतनं टीम इंडियाचा डावाला आकार दिला. श्रेयसनं आपल्या कारकीर्दीतलं पहिलं अर्धशतक साजरं केलं. तर रिषभ पंतनं देखील चांगली खेळी करत 70 धावा केल्या. सलामीचा लोकेश राहुल सहा तर त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहली केवळ चार धावा काढून माघारी परतले. तर रोहित शर्माही 36 धावा काढून बाद झाला.


टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात अखेरीस फॉर्मात परतला. चेन्नईच्या मैदानात विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे भारताची सुरुवातही खराब झाली होती. यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रोहित 36 धावा काढून बाद झाला.


चौथ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी 144 भागीदारी केली. ऋषभ पंत या सामन्यात 69 चेंडूत 71 धावांची खेळी करुन माघारी परतला. त्याच्या या खेळीत सात  चौकार आणि एका षटकार लगावला तर श्रेयसने 88 चेंडूत 70 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला.

यानंतर आलेल्या केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या तळातल्या फळीतील फलंदाजांनी संघाला 288 धावांचा टप्पा गाठून दिला. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कोट्रेल, किमो पॉल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2-2 तर कायरन पोलार्ड यांनी एक विकेट घेतली.