India Vs Pakistan War Mock Drill Maharashtra: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत पाकिस्तान (India Vs Pakistan War Mock Drill) यांच्यातला तणाव कमालीचा वाढलाय. युद्धाचे ढग निर्माण झालेत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

उद्याचा दिवस महाराष्ट्रातल्या 16 शहरांबरोबर संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे. युद्धसरावाचा भाग म्हणून उद्या (7 मे) महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. नागरी सुरक्षेच्या दृष्टीनं तीन श्रेणींमध्ये शहरांची विभागणी करण्यात आली आहे. देशातल्या 259 ठिकाणी उद्या होणार मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजल्यानंतर ब्लॅक आऊट होईल. मॉकड्रील, नागरी संरक्षण प्रशिक्षण काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेट्रो शहरं, औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील पुढील16 ठिकाणी उद्या होणार युद्धाची मॉकड्रील-

१. मुंबई२. उरण-जेएनपीटी३. तारापूर४. पुणे५. ठाणे६. नाशिक७. थळ-वायशेत८. रोहा-धाटाव-नागोठाणे९. मनमाड१०. सिन्नर११. पिंपरी-चिंचवड१२. संभाजीनगर१३. भुसावळ१४. रायगड१५. रत्नागिरी१६. सिंंधुदुर्ग

मॉकड्रील होणाऱ्या ठिकाणाचं महत्व काय?

मुंबई- मुंबईही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. 

उरण- महत्वाच्या तेल कंपन्या यामधे ओएनजीसी, बीपीसीएल सारखे तेलाचे प्लांट इथ आहेत. जर हल्ला झाला तर मोठा भडका उडू शकतो. जेएनपीटी सारखे पोर्ट याठिकाणी आहे. देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर मालाची आदान प्रदान याठिकाणाहून होते. उरणच्या चार ही बाजूने पाणी आहे.

तारापूर, पालघर- पालघर जिल्ह्यातील तारापूरमध्ये अणुउर्जा प्रकल्प आहे.

भुसावळ- सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी एक आहे. उत्तर महाराष्ट्रात पेट्रोलियम डेपो आहेत, त्याच पार्श्वभूमीवर माॅकड्रील होत असल्याची माहिती आहे. किनारपट्टी भागातील शहरांचा देखील समावेश आहे. 

थळ-वायशेत- थळ-वायशेत हे रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर आहे जिथे राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलायझर्सचा मोठा कारखाना आहे. याशिवाय तेलशुद्धीकरण प्रकल्पही त्याठिकाणी आहे.

ठाणे- कोस्टल शहर, एमएमआर शहर

पुणे- सायबर शहर 

रायगड - कोस्टल शहर म्हणून ओळख

रायगड - कोस्टल शहर

रत्नागिरी -  सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा देखील महत्त्वाचा आहे.  रत्नागिरीच्या समुद्रात कोस्ट गार्डच्या बोटिंकडून समुद्रात गस्त...बोटिंची केली जातेय तपासणी.  रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 16 लँडिंग पॉईंट्स; मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. 

सिंधुदुर्ग - कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा; सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकणात होणारी मॉक ड्रिल देखील महत्त्वाची आहे. 

सिन्नर- सिन्नर एमआयडीसी परिसर आहे. देवळाली आर्टिलरी सेंटरला लागून असलेला भाग असल्यानं सिन्नरला महत्व आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मॉकड्रिल होणार?, VIDEO:

संबंधित बातमी:

India Vs Pakistan War Mock Drill: हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर सर्वात आधी लाईट का बंद करायची असते?