Drone shooting without permission in Mumbai: मुंबईतील वांद्रे (Bandra) हे नेहमी गजबज असणारे शहर. या शहरातीस एका घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  वांद्रे (Mumbai News) पश्चिम येथे बेकायदेशीर ड्रोन शो पार पडला आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर (Drone Show) बसवून विनापरवानगी तब्बल 200 ते 250 ड्रोन्स उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे ड्रोन्स एका जाहिरातीच्या व्हिडीओ शूटिंगसाठी होतं, अशी माहिती आहे.  या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Continues below advertisement

मुंबईतील असंवेदनशील आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वांद्रे पश्चिम परिसरात परवानगीशिवाय 200 हून अधिक ड्रोन्स उडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  माहितीनुसार, ड्रोन उडवून  जाहिरातीसाठी व्हिडीओ शूटिंग करण्यात आले होते. दरम्यान, 28 मे रोजी  रात्री वांद्रे पोलिसांना याची गुप्त  माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करण्यात आली. 

वांद्रे पश्चिम येथे परवानगीशिवाय 200 हून अधिक ड्रोन उडवण्यात आले (Mumbai police seize over 200 drones)

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ड्रोन ऑपरेशन थांबवले. तसेच संबंधितांकडून चौकशी सुरू केली. या प्रकरणी दिल्लीस्थित एका मार्केटिंग कंपनीशी संबंधित दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह वांद्रे पोलिसांनी घटनास्थळावरून कॅमेऱ्यांनी सज्ज अनेक उच्च दर्जाचे ड्रोन, त्यांचे नियंत्रण करण्यासाठी वापरलेला लॅपटॉप आणि इतर तांत्रिक उपकरणे जप्त केली आहेत. 

Continues below advertisement

घटनास्थळावरून ड्रोन, लॅपटॉप आणि अन्य तांत्रिक उपकरणे जप्त (Bandra Illegal drone show)

मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन उडवण्यासाठी विविध यंत्रणांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मात्र, आवश्यक परवानग्या न घेता हा ड्रोन शो  आयोजित करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वांद्रे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ना 'पुष्पा' ना 'Animal'.. रश्मिका मंदानाने 'या' सिनेमासाठी घेतले सर्वाधिक मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक्

काळवीट शिकार प्रकरणावर सिनेमा? पोस्टर रिलीज होताच सलमान खानचा दणका, नोटीस धाडली

ABP माझाच्या बातम्या LIVE...