Rashmika Mandanna Cocktail: दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार अर्थात रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'पुष्पा' (Pushpa) सिनेमात मिळालेल्या प्रसिद्धीनंतर अभिनेत्रीने यशाचं शिखर गाठलं. केवळ भारतातच नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. 'पुष्पा', 'अॅनिमल' (Animal) या सिनेमांनंतर अभिनेत्री अभिनेत्री आता 'कॉकटेल 2' (Cocktail) सिनेमामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात तिची मुख्य भूमिका असून, अभिनेत्रीने या भूमिकेसाठी कोट्यवधींच्या घराच मानधन घेतलं असल्याची माहिती आहे.
अल्लू अर्जून अभिनीत 'पुष्पा' हा सिनेमा रश्मिकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या सिनेमातील साध्या भोळ्या 'श्रीवल्ली'नं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. या सिनेमानंतर तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. 'अॅनिमल' सिनेमातून तिला विशेष ओळख मिळाली.
रश्मिका मंदानाने कोणत्या सिनेमासाठी घेतले सर्वाधिक मानधन (How much did Rashmika charge for Cocktail 2)
'अॅनिमल' सिनेमानंतर रश्मिका मोठ्या बॅनरच्या सिनेमांशी जोडली गेली. दरम्यान, रश्मिका आता 'कॉकटेल 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात शाहीद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सेनन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा 19 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी रश्मिकानं कोट्यवधींच्या घरात मानधन घेतलं असल्याची माहिती आहे.
तेलुगु 360 च्या एका रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाने या सिनेमासाठी खास 12 कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. हे तिचे आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन आहे. त्याच अहवालात असेही उघड झाले आहे की, रश्मिका मंदाना तिच्या आगामी हिंदी चित्रपटांसाठी 15 कोटींहून अधिक रुपयांची मागणी करत आह. तर, दुसरीकडे, शाहिद कपूर हा हाइएस्ट पेड अॅक्टर असून, या सिनेमासाठी त्यानं 35 कोटी घेतले. तर, कृती सेनलाही 'कॉकटेल 2' साठी 14 कोटी रुपये मिळाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
काळवीट शिकार प्रकरणावर सिनेमा? पोस्टर रिलीज होताच सलमान खानचा दणका, नोटीस धाडली
ABP माझाच्या बातम्या LIVE...
