मूड देशाचा : देशात मोदींची हवा कायम मात्र आता निवडणुका झाल्यास एनडीएला फटका
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2020 09:01 PM (IST)
आज जर निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 300 जागा मिळू शकतील. तर काँग्रेस आणि युपीएला 130 जागा मिळतील अशी शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएला नुकसान होत असल्याचे चित्र आहे. हा सर्वे सर्व 543 लोकसभा क्षेत्रांमध्ये तब्बल 30 हजार 240 लोकांशी बातचीत करून हा सर्वे करण्यात आला.
नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष देखील झालेलं नाही. मात्र देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वे घेऊन देशाचा मूड जाणून घेतला. देशात आता जर निवडणुका झाल्या तर कोण जिंकणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेतून करण्यात आला. यासाठीमागील बारा आठवड्यात सर्व 543 लोकसभा क्षेत्रांमध्ये तब्बल 30 हजार 240 लोकांशी बातचीत करून हा सर्वे करण्यात आला. या सर्वेनुसार आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा कायम आहे. आज जर निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 300 जागा मिळू शकतील. तर काँग्रेस आणि युपीएला 130 जागा मिळतील अशी शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएला नुकसान होत असल्याचे चित्र आहे. असा आहे संपूर्ण सर्वे 1. मोदी सरकारवर लोकं किती समाधानी? खूप समाधानी - 56 टक्के काही प्रमाणात समाधानी - 24 टक्के असमाधानी - 20 टक्के 2. मोदी सरकार कोण आहेत खुश (विभागानुसार)? नॉर्थ ईस्ट- 82 टक्के ओडिसा - 78 टक्के हिमाचल प्रदेश- 65 टक्के उत्तर प्रदेश- 67 टक्के जम्मू कश्मीर- 60 टक्के 3. आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा? आता 2019 मधील जागा एनडीए-330 जागा 353 जागा यूपीए-130 जागा 96 जागा अन्य-83 जागा 93 जागा 4. एनडीएला कोणत्या राज्यात किती जागा मिळणार? यूपी-69 बिहार-36 एमपी-25 राजस्थान-21 गुजरात-26 महाराष्ट्र-21 आसाम-10 दिल्ली-7 बंगाल-22 कर्नाटक-22 5. आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती टक्के मतं? आता 2019 मध्ये एनडीए-44% 44% यूपीए-25% 25% इतर -31% 31% 6. पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती? नरेंद्र मोदी- 70 टक्के राहुल गांधी- 25 टक्के दोघेही नाही - 5 टक्के 7. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर किती समाधानी ? मुख्यमंत्री खूप समाधानी समाधानी असमाधानी योगी आदित्यनाथ 39 26 35 अरविंद केजरीवाल 59 24 17 नितीश कुमार 44 30 26 उद्धव ठाकरे 28 31 41 ममता बनर्जी 67 2 31 अशोक गहलोत 28.6 44.6 27 कमलनाथ 18 46 36 मनोहरलाल खट्टर 22 23 55 8. देशातील सर्वात मोठी समस्या? भ्रष्टाचार-6.4 टक्के महागाई-6.5 टक्के बेरोजगारी-17.1 टक्के शेजारी देश-0.4 टक्के गरीबी-11.7 टक्के वीज-रस्ते-पाणी -11 टक्के दहशतवाद 4.6 टक्के शेतीसंबंधित समस्या- 4.2 टक्के