तर प्रवीण दराडे यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदावरुन आयुक्त समाज कल्याण पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. प्रवीण दराडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या बंगल्यावरून सेनेनं आक्षेप घेतला होता.
आणखी काही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.
अशा आहेत बदल्या
राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास
संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई
शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई
पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा
श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे
डी डी पांढरपट्टे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची बदली महासंचालक माहिती व जनसंपर्क मुंबई
प्रवीण दराडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त
जिल्हाधिकारी गडचिरोली शेखर सिंग हे सातारा जिल्हाधिकारी पदी
मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची बदली जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर
मिलिंद शंभरकर आयुक्त समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर
आर बी भोसले जिल्हाधिकारी सोलापूर यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण
नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांची नियुक्ती आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे
आर एस जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर या पदावर
भुवनेश्वरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा या पदावर
मदन नागरगोजे यांची बदली संचालक माहिती व तंत्रज्ञान मुंबई