Digital Health Identity Card: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर रोजी आयुष्मान भारत-डिजिटल मिशन ची सुरूवात केली. या मिशनमध्ये लोकांना डिजिटल आरोग्य ओळख पत्र (digital health identity card) वाटण्यात येणार आहे. या ओळख पत्राद्वारे लोकांच्या आरोग्याच्या संबंधीत रेकोर्ड ठेवण्यात येणार आहे.
डिजिटल हेल्थ ID कार्ड
आधार कार्ड सारखे हे कार्ड यूनिक आयडी कार्ड असणार आहे. जे तुमच्या हेल्थ रेकोर्डला मेंटेन ठेवायला मदत करेल.
डिजिटल हेल्थ ID कार्ड तुमच्या पर्सनल डिटेल्सच्या आधारे बनवले जाईल.
आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून हा आयडी बनवला जाईल.
हा आयडी हेल्थ रेकोर्ड ठवण्यासाठी आईडेंटिफायरच्या स्वरूपात काम करेन.
सिस्टम डेमोग्राफिक,लोकेशन, फॅमिली/ रिलेशनशिप आणि संपर्क क्रमांक बरोबरच काही महत्वपूर्ण माहिती देखील एकत्र करेल.
त्यानंतर नागरिकाची परवानगी घेतल्यानंतर या सर्व माहितीला हेल्थ ID सोबत जोडले जाईल.
NDHM च्या वेबसाइटनुसार, 'पर्सनल हेल्थ रेकॉर्ड-सिस्टम (पीएचआर)' ही माहिती आपल्याला हेल्थ केअरबद्दल सक्षम बनवते.
डिजिटल हेल्थ ID कसे काम करेल
डिजिटल हेल्थ ID प्रोफेशनल रजिस्ट्री, हेल्थ फैसिलिटी रजिस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड नावाच्या चार ब्लॅक योजनामध्ये सामिल होईल
या चार ब्लॉकच्या माध्यमामधून स्वास्थ सेवेचे एक डिजिटल एनवायरमेंट तयार करण्याचा या योजनेचा उद्धेश आहे.
मिशन एक 'इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड (EMR)' तयार करेल. ज्यामध्ये रूग्णाची मेडिकल आणि ट्रिटमेंटची हिस्ट्री असेल.
असे तयार करा डिजीटल हेल्थ कार्ड
नेशनल डिजिटल हेल्थ मिशन की वेबसाइट gov.in वर जावा.
त्यामध्ये तुम्हाला Create Health ID नावाचा ऑप्शन दिसेल
तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुमची कार्ड तयार करायची प्रक्रिया सुरू होईल
तुम्हाला आधार कार्डची माहिती विचारली जाईल.
आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफाय करावा लागेल.
आधार कार्ड शिवाय देखील हेल्थ कार्ड तयार करू शकता.
फक्त मोबाईल नंबर देऊनही हेल्थ कार्ड तयार करू शकता.
मोबाईल नंबर दिल्यानंतर OTP व्हेरिफाय करावा लागेल,
प्रोफाइलसाठी स्वत:चा एक फोटो, जन्म तारिख, पत्ता ही माहिती द्यावी लागेल.
तुमच्या समोर एक फोर्म येईल तो तुम्हाला भरावा लागेल
सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे हेल्थ आयडी कार्ड तयार होऊन येईल.
हेल्थ आयडी कार्डमध्ये फोटो आणि एक QR कोड असेल.