Horoscope Today 29 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 29 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार मंगळवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आर्थिक घडी व्यवस्थित बसली तरी, पैशाला अनेक वाटा फुटतील, त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल    

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज जीवनात वादळे निर्माण होतील, परंतु समजूतीचे धोरण उभयतांनी ठेवायला हवे 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, लोक टीका करतात म्हणून काळजी करू नका  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकाल, परंतु मनाला फसवणं अवघड आहे, तेव्हा मनाचा कौल सर्वात महत्त्वाचा माना  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज महिला जे ठरवतील, त्यापेक्षा वेगळीच कृती करतील, पित्ताचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी वेळेवर सांभाळावे  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज बोलल्यावर नियंत्रण ठेवायला हवे, बोलायच्या अगोदर विचार करा बोलून विचारात पडू नका     

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरू शकते, त्याप्रमाणे कृती करा   

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अचानक खर्च उद्भवतील, विद्यार्थ्यांना नवीन कल्पना सुचतील   

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज कोणतेही आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नका 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्यात थोडे मनस्तापाचे प्रसंग येतील, पण समस्या ही संधी असू शकते हे लक्षात ठेवा

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांना जिद्दीचे पंख द्या, मग तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही   

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज महिला लहरी बनतील, हाता तोंडाशी आलेल्या कामांमध्ये यश मिळाले तरी, त्या यशाचे समाधान मिळणार नाही

हेही वाचा :

29 एप्रिल तारीख जबरदस्त! शुभ योगांनी 'या' 5 राशींचं नशीब चमकणार, हातात खेळेल पैसा, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)