नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तणाव वाढला असून दोन्ही देशाचे सैन्य दल सज्ज झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट जाहीर सभेतून पाकिस्तानला इशारा दिला असून हल्लेखोरांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलं. तर, कॅबिने सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच, देशातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचेही बजावले आहे. दुसरीकडे भारतीय सैन्य (Indian army) दलाला सज्ज राहण्यास सांगितल्याने पाकिस्तानाला धडकी भरली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारत कधी पण हल्ला करू शकतो, असे आसिफ यांनी म्हटलं आहे.
भारत कधीही हल्ला करू शकतो, त्यामुळे पाकिस्तान सैन्य दलाने अलर्ट राहावे, अशा सूचना पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं की, पाकिस्तान सैन्याने भारताकडून संभाव्य हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तान पूर्णपणे अलर्ट आहे, पाकिस्तान तेव्हाच परमाणू हत्यारांचा वापर करेल जेव्हा आमच्या अस्तित्वाला धोका असेल, असे ख्वाजा यांनी म्हटलंय. दरम्यान, यापूर्वी सिंधू जल करारासंदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयानंतरही ख्वाजा यांनी प्रतिक्रिया दिली होती. भारत पाण्याला एका शस्त्रासारखं वापरत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तावर आणि दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. भारतीय सैन्य दलही सज्ज झालं असून केंद्रीय स्तरावर सातत्याने घडामोडी घडत आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध काही ठोस निर्णय घेतले असून भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल, असा राजकीय अंदाजही लावण्यात येत आहे.
पर्यटनावर मोठा परिणाम
दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 नागरीक ठार झाले आहेत. या हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटनासाठी बुकींग केलेल्या हजारो पर्यटक नागरिकांना आपलं बुकींग रद्द केलं असून तेथील पर्यटनावर या हल्ल्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
फ्रान्ससोबत राफेल खरेदीसाठी करार
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल नौदल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतील बैठकीत या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्याचे समजते. या करारामुळे भारतीय नौदलाची सामरिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नव्या करारामुळे भारताकडे असलेल्या राफेल लढाऊ विमानांची एकूण संख्या आता 62 वर पोहोचणार आहे.
हेही वाचा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 4 दिवसांनी चीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, आम्ही तुमचे शेजारी...