हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा एकदा एका एसटी बसवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हिंगोली (Hingoli) शहरा नजीक हा प्रकार समोर आला आहे. ही बस शेगावहून नांदेडकडे (Nanded) निघाली होती, दरम्यान, हिंगोली शहराजवळ येताच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतेही दुखापत झालेली नाही. तर, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान, हिंगोली शहरात देखील शुक्रवारी पुन्हा एकदा एका बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शेगाव येथून निघालेली एम.एच. 06 एस 873 क्रमांकाची एसटी बस नांदेडकडे निघाली होती. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान ही बसवर हिंगोली शहरानजीक येताच तिच्या दगडफेक करण्यात आली. मात्र, सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतेही दुखापत झाली नाही. मात्र, बसच्या पाठीमागील काच फुटल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, काच फुटून दगड आतमध्ये आल्याने जोरात आवाज झाला, आणि प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला होता. 


अन् तत्काळ बस हिंगोली बसस्थानकात आणली


शेगावहून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसवर हिंगोलीत दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या घटनेने प्रवासी घाबरून गेले होते. मात्र, बस चालक बाळासाहेब उत्तमराव पाटील व वाहक गजानन अंबादासराव देसाई यांनी तत्काळ बस हिंगोली बसस्थानकात आणली. त्यानात्र आपल्या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना केले. दरम्यान, याची माहिती मिळताच हिंगोली बसस्थानकात आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी बसची पाहणी केली. तसेच, पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार,या घटनेप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला...


शेगावहून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसवर हिंगोळी शहराजवळ पोहचताच दुचाकीवरून मागून आलेल्या दोन अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. ज्यात एक मोठा आवाज आला आणि एक दगड बसच्या आतमध्ये येऊन पडला. त्यामुळे आतमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नेमकं काय घडतय कोणालाच काही कळत नव्हते. मात्र, बस चालक बाळासाहेब उत्तमराव पाटील व वाहक गजानन अंबादासराव देसाई यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ बस हिंगोली बसस्थानकात आणली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : भुजबळांची तारीख ठरली, जरांगेंचीही तयारी; हिंगोलीत दोन्ही नेत्यांच्या एकामागून एक सभा