हिंगोली : हिंगोलीचे (Hingoli)  खासदार हेमंत पाटील (Hemant Patil)  यांना धमकीचा फोन आला आहे.  खलिस्तानी अतिरेकी संघटनेकडून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे.  26 जानेवारीला होणारा कार्यक्रम उधळण्याची धमकी देण्यात आलीआहे. लंडनहून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या अगोदर देखील दहा दिवसांपूर्वी देखील धमकीचे फोन आला होता


हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानी अतिरेकी संघटनेकडून धमकीचा फोन खासदार पाटील यांना लंडनहून धमकीचा फोन आला. 26 जानेवारीला दिल्ली येथे होणारा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी यावेळी दिली आहे . खासदार पाटील यांनी ही माहिती राष्ट्रपती पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कळवले आहे. दरम्यान  यामुळे खासदार हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे तर हेमंत पाटील यांच्या घरासमोरील बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे.


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र 


खासदार हेमंत पाटील यांनी धमकीचे फोन आल्याची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे  देण्यात आली आहे. हेमंत पाटील म्हणाले,  14 डिसेंबरला मला पाहिलं फोन आला तो इंग्रजीत बोलत होता. देशात स्फोट घडवणार असल्याचं सांगितलं.  15 तारखेला मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना गोष्ट सांगितलीय पुन्हा 20 तारखेला फोन आला तो मी उचलला नाही त्यामुळं मी लगेच दिल्लीत वरिष्ठांना पत्र लिहिलं. त्यांच्या कार्यालयाला मी माझं पत्र दिलं आहे. मला आधीच सुरक्षा आहे.


आतापर्यंत  दोन वेळा खासदारांना धमकीचा फोन


खलिस्तानी दहशतवादी गुरदीप सिंह पण्णू कडून खासदारांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय नंबर वरून धमकीचा फोन  आला. आतापर्यंत  दोन वेळा खासदारांना धमकीचा फोन आला आहे.  14 डिसेंबरला रात्री 10 वाजता फोन आला होता. 26 जानेवारीला होणारा कार्यक्रम उधळण्याची धमकी देण्यात आली आहे. तुम्हाला स्वतःला वाचवायचं असेल तर वाचवा, असा मेसेज देण्यात आला आहे. हेमंत पाटील यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत धमकीची माहिती दिली आहे. 


हे ही वाचा :


Eknath Shinde : स्वतः अमित शहांनी सांगितलंय, शिंदे गट लोकसभेच्या 13 जागा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या खासदाराचा दावा