Sharad Ponkshe Purush Natak Beed: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Cinema) दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) नेहमीच चर्चेत असतात. सध्या शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांचं पुरूष (Purush Natak) नाटक जोरात सुरू आहे. राज्यभरात या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असलेले शरद पोंक्षे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यानं आजवर अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. नुकताच शरद पोंक्षेंच्या पुरूष (Purush) नाटकाचा प्रयोग बीडमध्ये पार पडला. यावेळी त्यांनी नाटकाच्या प्रयोगावेळी आलेला अनुभव शेअर केला आहे. शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. 


लेखक जयवंत दळवी यांचं मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या 'पुरूष' नाटकात स्वतः अभिनेते शरद पोंक्षे आहेत. त्यांच्यासोबतच या नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेते अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईल, नेहा परांजपे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नुकताच बीडमध्ये 'पुरूष' नाटकाचा प्रयोग पार पडला. ज्या नाट्यगृहात 'पुरूष'चा प्रयोग पार पडला, त्या नाट्यगृहाबाबत शरद पोंक्षे यांनी पोस्ट केली आहे. जी सध्या चर्चेत आहे. नाट्यगृह अत्यंत अस्वच्छ असल्यांचं शरद पोंक्षे यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. 


'पुरूष' नाटकाची टीम सध्या राज्यभरात नाटकाचे प्रयोग करत आहे. अशातच 15 फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये, 16 फेब्रुवारीला बीड, 17 फेब्रुवारीला नांदेड, 18 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर आणि 19 फेब्रुवारीला जळगावात या नाटकाचे प्रयोग पार पडले. यापैकी बीडमध्ये प्रयोग करताना संपूर्ण नाटकाच्या टीमला आलेल्या वाईट अनुभवाबाबत शरद पोंक्षे यांनी वक्तव्य केलं आहे. 


इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करताना शरद पोंक्षे यांनी लिहिलं की, "पुरूष' नाटकाचा बीड च्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आज प्रयोग झाला.तेव्हा ह्या नाट्यगृहाचा अतिशय भयंकर अनुभव आला. अस्वच्छता.बाथरूमची भयाण अवस्था.त्याबद्दल कलाकारांनी खंत व्यक्त केली व निषेध नोंदवला.समोर बीड नाट्यपरिषद पदाधिकारी व ऊपायुक्त ऊपस्थित होते." 


शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? 


शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले आहेत की, "अतिशय अप्रतिम रसिक प्रेक्षक आहेत आणि या रसिक प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतक्या लांब प्रवास करून येत असतो. गंभीर विषयावरचा एक नाटक इतका चांगला प्रतिसाद इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही ते रिसिव्ह करताय त्यासाठी खरोखरच तुमचं कौतुक."


"पण रसिक हो, पुन्हा पुन्हा इथे ये ना आम्हाला शक्य होणार नाही कारण या नाट्यगृहाची दुरावस्था... इतकी भयानक दुरावस्था आहे की, एसी थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून 21 हजार रुपये घेतले गेले. पण नाट्यगृहात एसीच नाही. मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं नसतं. इथे प्रसाधनगृह नाहीत, बाथरूमची अवस्था इतकी भीषण आहे ती महिला कलाकारांना तिथे जाणच शक्य नाही... मेकअप रूम नाही स्वच्छता नाही... या नाट्यगृहाला वालीच नाही. आज शासनाचे खूप मोठे अधिकारी इथे बसलेत त्यांनी दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती.", असं शरद पोंक्षे म्हणाले.






"ज्या कोणाच्या अंडर हे नाट्यगृह येत असेल, तर त्यांना बोलावून सांगा की, जर अशीच नाट्यगृहाची अवस्था ठेवली, तर दर्जेदार नाटक आणि कलाकारांपासून बीडचे रसिक प्रेक्षक मुकतील. मला तर इथे परत येण्याची इच्छाच नाही. मी बीडला येईन, तुम्ही कार्यक्रमाला बोलावलात तर तिकडे येईल पण या थेटर मध्ये येऊन नाटक करावं अशी आमची इच्छा आज मेली आहे. खूपच भयानक परिस्थिती आहे. नाट्य रसिकांची सुद्धा नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे तुम्ही याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण बीडमध्ये चांगलं नाटक येणे बंद होईल. अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत. मी बोलतोय त्याचा फार काही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे कारण मी या विषयावर 1000 वेळा बोलून झालोय पण राहवत नाही. फार वाईट अवस्था आहे...", असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Vicky Kaushal Chhaava Movie Online Leaked: विक्की कौशलच्या 'छावा'ला मोठा फटका; 2 तास 35 मिनिटांचा सिनेमा ऑनलाईन लीक, 'छावा'च्या बॉक्स ऑफिसवरील घौडदौडीला ब्रेक लागणार?