Shrirang Barge on Gunaratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रश्नी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूरचे श्रीरंग बरगे आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. श्रीरंग बरगे यांनी सदावर्ते यांना कोल्हापूरी हिसका दाखवल्याची चर्चा व्हायरल व्हिडिओतून होत आहे. श्रीरंग बरगे यांनी सदावर्तेंचा एसटी कृती समितीशी कोणताही संबंध नसल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी घुशीप्रमाणे घुसखोरी केल्याची टीका केली. 


तो मला टकल्या म्हणाल्याने मी त्याला हेकन्या म्हणालो! 


दोघांमध्ये कोणत्या विषयावर वाद झाला हे श्रीरंग बरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बरगे म्हणाले की, गुणरत्न सदावर्तेंचा एसटी कृती समितीशी संबंध नाही. ते मध्येच घुसले असून घुशीप्रमाणे घुसखोरी केल्याचा आरो श्रीरंग बरगे यांनी केला. ते मध्येच भाषण करायला लागल्यानंतर मी त्यांच्या कृतीला विरोध केला. मी आक्षेप नोंदवल्यानंतर तो मला टकल्या म्हणाल्या, मी त्याला हेकन्या म्हणालो. त्यानंतर तो पुढे येत असताना मी त्याच्या अंगावर धावून गेलो. कारण मी कोल्हापूरचा आहे. पैलवानांच्या तालमीतला आहे त्याला घाबरणारा नाही. त्यानं इतरांना घाबरवलं असेल, मी घाबरणारा नाही, असे श्रीरंग बरगे म्हणाले. 






कोल्हापुरी पाणी काय असते, ते दाखवून दिले


दरम्यान, बरगे सदावर्ते यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमध्ये मध्यस्थी सावरले. दरम्यान, बरगे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. बरगे यांनी सांगितले की, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून 43 वर्षांपासून कार्यरत आहे. प्रसिद्धीसाठी सदावर्ते नेहमी ज्येष्ठ नेत्यांना काहीही बोलत असतात. एसटी कर्मचारी आंदोलनातही प्रसिद्धीसाठी त्यांनी घुसखोरी केली. म्हणून मी त्यांना बाप भेटलो. कोल्हापुरी पाणी काय असते, ते दाखवून दिले. 


इतर महत्वाच्या बातम्या