Imtiaz Jalil : अहिल्यानगरमध्ये आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार होती. मात्र ही सभा सद्दा झाली असल्याची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक आणि IG यांनी आम्हाला संपर्क केला आहे. यावेळी त्यांनी ही सभा पुढे ढकलण्याची विनंती केल्याची माहिती जलील यांनी दिली. यावर आम्ही देखील सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जलीलयांनी दिली.
आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही
काल अहिल्यनगरमध्ये जी घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला आहे. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. 9 तारखेला आम्ही सभा घेऊ शकतो. कुणी मागणी केल्यामुळे आम्ही सभा रद्द केली असे नाही. अहिल्यनगरमधील शाळेत घडलेला प्रकार हा सुनियोजित होता. प्लॅनिंग करुन सगळं झालेले आहे. यामध्ये कुणाचं षडयंत्र आहे की आम्ही तिथे कुणी येऊ नये याचाही तपास केला पाहिजे. काही राजकीय पक्षांनी मिळून एमआयएम तिथे येऊ नये यासाठी हे सगळं केलं असल्याची माहिती आहे असं जलील म्हणाले.
पुढच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ए आय एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन अहिल्यनगर शहरातील मुकुंदनगर भागात करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने एआयएमआयएमच्या वतीने CIV मैदानावर तयारी करण्यात देखील आली होती. मात्र पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नव्हती. पण पोलिसांच्या ज्या शंका होत्या त्याचे समाधान करण्यात आले असून आम्हाला नक्कीच सभेला परवानगी मिळेल अशी अपेक्षा एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अश्रफी यांनी व्यक्त केली होती. संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही सभा घेऊ शकतो आणि सध्या अहिल्यनगर शहरात जे मुस्लिम विरोधी वातावरण तयार झाले आहे त्याला संविधानिक पद्धतीनेच आम्ही या सभेच्या माध्यमातून उत्तर देऊ असं अश्रफी यांनी म्हंटलं होतं. मात्र, अहिल्यानगरमध्ये आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांची होणारी सभा रद्द झाली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची माहिती दिली होती. तसेच पोलिसांनी विनंती देखील केली होती की, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगरमध्ये होणारी सभा पुढे ढकलण्यात यावी.
महत्वाच्या बातम्या: