Gondia News : शेतकऱ्याला (Farmers) शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन (Electrical connection) जोडून देण्याच्या नावावर 2 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) एका कर्मचाऱ्यांसह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील केशोरी येथे गोंदिया एसीबीने पथकाने ही कारवाई केली आहे. महावितरणचे (Mahavitaran) कर्मचारी रणदीप काशीराम गोखे (40) व मृणाल ब्राह्मणकर (40) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार हे शेतकरी असून मौजा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावाने असलेल्या शेतीतील बोअरवेलवर मोटरपंप चालवण्यासाठी त्यांच्या आईच्या नावाने मीटर लावलेले आहे. यातील आरोपी महावितरणचे कर्मचारी रणदीप गोखे यांनी तक्रारदारांच्या शेतातील बोअरवेल वरील विद्युत मीटर खराब झाल्याचे सांगुन कनेक्शन कट केले. तक्रारदाराने नवीन मीटरची मागणी केली असता आरोपीने तक्रारदाराला तुला डायरेक्ट वायर जोडून देतो. तसेच डायरेक्ट वायर जोडून वीज वापरल्यामुळं वीज चोरीची कारवाही देखील करत नाही. त्यासाठी तुला 2 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
पंचासमक्ष 2 हजार रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक
तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी याने डायरेक्ट विद्युत वायर जोडून अवैधरित्या वीज वापरण्याकरता व तक्रारदार यांच्यावर यापुढे कोणतीही कारवाई न करण्याकरता 2 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. कारवाईदरम्यान आरोपी गोखे यांच्या सांगण्यावरून दुसरा आरोपी मृणाल ब्राह्मणकर याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष 2 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime News: पुण्यात 20 हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला अद्दल घडली; सब इनस्पेक्टर निलंबित, नेमकं काय आहे प्रकरण?