Gondia Husband Wife Suicide : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पहिला पत्नीने रेल्वेखाली जीव दिला आणि त्यानंतर पतीनेही तेच पाऊल उचलंत आत्महत्येचा पर्याय निवडला. चार महिन्यापूर्वीच डिकेश्वर आणि दिगंबर यांचा प्रेमविवाह झाला होता, पण त्यांचा संसार औकघटकेचा ठरला.
डिकेश्वर आणि दिगंबर या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेमविवाह संपन्न झाला होता. मात्र हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला होता. यामुळे पत्नी डीकेश्वरी भुसारीने गोंदिया चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ तिच्या पतीनेसुद्धा रेल्वेपुढे उडी येत आत्महत्या केली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर भुसारी असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी डीकेस्वरी हीने याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती. पत्नीनंतर आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
जानेवारी महिन्यातच झाला होता प्रेमविवाह
दिगंबर भुसारी हा तरुण गावातच मजुरीचे काम करत होता. दरम्यान त्याचा परसोडी येथील डिकेश्वरी सोबत जानेवारी महिन्यात प्रेमविवाह झाला होता. मात्र त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबातील अन्य सदस्यांचा विरोध होता अशी माहिती आहे. सततच्या होणाऱ्या विरोधाला कंटाळून डीकेश्वरी हिने आत्महत्या केली असावी असे तर्क लावले जात आहेत. तर पत्नीच्या जाण्याने एकाकी पडलेल्या दिगंबर भुसारी याने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.
पती-पत्नीच्या आत्महत्या नंतर गावात पसरली शोककळा
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने एकापाठोपाठ आत्महत्या केल्याने सौंदड गावात शोककळा पसरली आहे. या दोन्ही पती-पत्नीच्या आत्महत्या संदर्भात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात असले तरी मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही हे विशेष.