मुंबई: गुजरातच्या गीरमधील गाईंच्या गोमूत्रात सोन्याचा अंश मिळाला आहे. जूनागढ कृषी विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी चार वर्षांपासून केलेल्या संशोधना अंति परिणाम मांडले. यात गीर प्रांतातील पाळीव गायींच्या गोमूत्रात सोन्याचा अंश मिळाला आहे. वैज्ञानिकांनी यासाठी गीरमधील 400 गाईंवर संशोधन केला. या 400 गाईंच्या गोमूत्रात 3 ते 10 मीलिग्रॅमपर्यंत सोन्याचा अंश मिळाला आहे.

 

विशेष म्हणजे, वैज्ञानिकांना या संशोधनामध्ये गोमूत्रात जवळपास 5100 विविध पदार्थ मिळाले आहेत. यातील 388 पदार्थांपासून उच्च दर्जाची औषधे निर्माण करता येऊ शकण्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. याशिवाय संशोधकांनी उंट, म्हैस, मेंढ्या आणि बकरींच्या मलमूत्रावरही संशोधन केले. पण यात कोणतेही अॅन्टी बायोटिक तत्त्व मिळाले नाहीत.

 

विद्यापीठाच्या फूड टेस्टिंग लॅबोरेट्रीला नॅशनल एक्रिडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग कॅलिब्रेशन लॅबोरेट्रिजकडून मान्यताही मिळाली आहे. दरवर्षी ही लॅब जवळपास 50,000 तपासण्या करते.