South Mumbai Power Outage: न थांबणारे दक्षिण मुंबईकर (South Mumbai) सध्या वीजखंडितमुळे हैराण झाले आहेत. मुंबईतील गिरगाव (Girgaon) परिसरात तसेच माझगाव परिसरातील काही भागांमध्ये रविवारी रात्रीपासून वीजपुरवठा (Electricity) खंडित झाला आहे. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. सतत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वीजपुरवठा प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा त्रास दोन-तीन महिन्यांपासून नागरिकांना होत असल्याची तक्रार समोर आली आहे.
दक्षिण मुंबईकरांना वीजेनं छळलं (Girgaon electricity supply disruption)
गिरगाव (Girgaon) परिसरातील काही भागांमध्ये रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ठाकूरद्वार रोड, जे.एस.एस. रोड, मुगभाट रोड, खेतवाडी, सी.पी. टँक आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना या समस्येचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, ही समस्या केवळ आजची नसून, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. सकाळच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत, तसेच सायंकाळी नागरिक घरी परतत असताना, वीज जाण्याच्या घटनांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
बेस्टच्या भूमिगत वीज केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती (Frequent Power Cuts Spark Anger Among South Mumbai Residents)
दरम्यान, बेस्टच्या भूमिगत वीज केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भूमिगत केबलवर क्षमतेपेक्षा अधिक लोड आल्यामुळे बिघाड निर्माण झालाय. तसेच परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) कामांमुळेही केबलवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुढील 2 ते 3 तासांत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वारंवार होणाऱ्या वीजखंडितमुळे नागरिक हैराण (Girgaon and Mazgaon Face Extended Blackout)
बेस्टचे कर्मचारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत आहेत. वाढलेला वीजभार, जुनी केबल व्यवस्था आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या वीजखंडितमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, बेस्ट प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?
ABP माझाच्या बातम्या LIVE...
