Raja Shivaji Day 31 Box Office Collection: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमाची चित्रपटगृहात (Entertainment) घौडदौड कायम आहे. या अॅक्शन ड्रामा सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या एन्ट्रीने सर्वांना आश्चर्य चकित केलं. आतापर्यंतचा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. दरम्यान, चार आठवड्यात दमदार कामगिरी केल्यानंतर या सिनेमानं पाचव्या आठवड्यात यशस्वीरित्या पदार्पण केलं आहे.   दरम्यान, सिनेमा प्रदर्शित होऊन 31 व्या दिवशी या सिनेमानं किती रुपयांचे कलेक्शन केले?  जाणून घेऊयात.

Continues below advertisement

31 व्या दिवशीही 'राजा शिवाजी' सिनेमाची चित्रपटगृहात घौडदौड (Riteish Deshmukh Raja Shivaji total earnings)

'राजा शिवाजी'  हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही अद्याप या सिनेमाची जादू कमी झालेली नाही. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडी रिपोर्ट्सनुसार,  काल पाचवा रविवार होता.  रविवार असूनही या सिनेमाचे 527 शोज झाले. 527 शोजमधून सिनेमानं 68 लाख रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  रविवारच्या सुट्टीचा फायदा नक्कीच या सिनेमाला झाला.  

सध्या 'राजा शिवाजी'  व्यतिरिक्त बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2' या सिनेमानं वादळ आणलं आहे  21 मे रोजी 'देऊळ बंद 2' हा सिनेमा रिलीज झाला होता. दरम्यान, 'देऊळ बंद 2' हा सिनेमाही  बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे.  कोईमोईच्या रिपोर्टनुसार,  'राजा शिवाजी' या सिनेमानं  28 दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.  28 म्हणजेच चार आठवड्यात या सिनेमानं 103.15 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.  तर या सिनेमाचे ग्रॉस कलेक्शन 121.71 कोटी इतके आहे. 

Continues below advertisement

'राजा शिवाजी' सिनेमात तगड्या कलाकारांची फौज,  सलमान खानच्या भूमिकेची चर्चा (Raja Shivaji 5th Sunday collection)

'राजा शिवाजी' या सिनेमात रितेश देशमुख व्यतिरिक्त सलमान खान, संजय दत्त, महेश मांजरेकर, जेनिलिया डिझुझा,  भाग्यश्री, बोमन इराणी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाची भूमिका आहे. 'राजा शिवाजी' हा सिनेमा 75 कोटी बजेटमध्ये तयार करण्यात आला.  28 दिवसांत या सिनेमानं  103.15 कोटींचे कलेक्शन केले.  म्हणजेच या सिनेमानं 4 आठवड्यात  28.15 कोटींचा नफा कमावला आहे.   

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशा भोसलेंनंतर आणखी एक दैवी सूर हरपला; दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, ऐका त्यांची 10 अजरामर गाणी

ABP माझाच्या बातम्या LIVE...