मुंबई : हरभजन सिंह आणि गीता बसरा यांच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. हरभजन आणि गीता लवकरच आई-बाबा होणार असल्याची माहिती जवळच्या सुत्रांनी दिली आहे.

भज्जी आणि गीता यांचं लग्न मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालं होतं. आयपीएल 9 च्या उद्घाटन सोहळ्यात गीता अगदीच सैल ड्रेस परिधान करुन आली होती. त्यामुळे गीता प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगू लागली.

गीता डिलिव्हरीसाठी लवकरच लंडनला जाणार आहे. लंडनमध्ये तिचे आई-वडील राहतात.

या सेलिब्रिटींच्या घरीही पाळणा हलणार



हरभजन सिंहच नाही तर त्याचा सहकारी क्रिकेटर सुरेश रैनाही लवकरच बाबा होणार आहे. रैनाची पत्नी प्रियांका प्रेग्नंट असून पुढील महिन्यात तिची डिलिव्हरी होईल. एका मुलाखतीत स्वत: सुरेश रैनाने याबाबतची माहिती दिली. मी लवकरच बाबा होणार असून प्रचंड खूश आहे. काही दिवसांपूर्वीच मी हॉलंडमधून परतलोय. माझी आई आधीपासूनच तिथे आहे. ती प्रियांकाची देखरेख करत आहे. मी देखील लवकरच तिथे जाणार आहे, असं रैना सांगितलं.

सुरेश रैनाची पत्नी प्रियांका चौधरी हॉलंडमध्ये राहते. तिथे ती बँकमध्ये जॉब करते. रैनाच्या माहितीनुसार तिची डिलिव्हरी तिथेच होणार आहे.

याशिवाय बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा हीदेखील गरोदर आहे.