Ganesh Visarjan 2025 : मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रा आज (6 सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला (Ganesh Utsav 2025) निरोप देण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सर्वत्र मोठी धामधून सुरु असून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईत 18 हजार पोलिसांसह 10 हजार कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर ठाण्यात आली असून यंदा पहिल्यांदाचा AI चा देखील वापर केला जाणार आहे. सुरक्षेसाठी विशेष नाकेबंदी, नियंत्रण कक्ष आणि आपत्कालीन पथके तयार करण्यात आली असून विसर्जन मिरवणुकींवर आणि गर्दीवरही बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. तर तिकडे पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे. हाच उत्साह संपूर्ण महाराष्ट्ररात बघायला आज मिळणार आहे.

लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज; खास अत्याधुनिक तराफा

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. लालबागच्या विसर्जनासाठी यंदा खास अत्याधुनिक तराफा तयार करण्यात आला आहे. गिरगाव चौपाटीवर दरवर्षी उसळणारा भक्तिसागर आणि पूर्वीच्या दुप्पट आकारापेक्षा यावर्षी राजाच्या तराफ्याची विशेष रचना करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला समुद्रात मार्गक्रमणासाठी कुठल्याही बोटीच्या साह्याची गरज भासणार नाही. कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा स्वतःच समुद्र लाटांवर स्वार होऊन आगेकूच करणार आहे. त्यामुळे विसर्जनक्षणांचा भार सांभाळताना तो स्थिर राहावा, यासाठी विशेष अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला आहे. गुजरातमध्ये हा विशेष तराफा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 360 अंशांत पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर देखील यामध्ये बसवण्यात आले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन मिरवणूक रथ तयार

गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे  सर्व गणेश मंडळांची विसर्जन रथ बनवण्याची लगबग पाहायला मिळतीय.पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे. उत्सवाचं यंदा 133वं वर्ष आहे. यंदा 'श्री गणनायक' रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.  या विसर्जन मिरवणुकीच्या रथाचे काम आता पूर्ण झालेल आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघालेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणी करण्यात आली आहे.

विष्णूचे वाहन म्हणून श्री गणनायक रथावर समोरच्या बाजूला चार गरुड लावण्यात आलेले आहेत. 8 स्तंभांवर हा रथ उभारण्यात आला आहे. केरळ मधील मंदिरांना असते त्याप्रमाणे या रथाला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. केरळमधील मंदिरांप्रमाणे गोपुराही यामध्ये साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलायं. त्याचप्रमाणे 30 क्रिस्टल झुंबर या रथाला बसविण्यात आले आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या रथाला चार सीसीटीव्हीही बसवण्यात आलेले आहेत.

पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): 9.30 वाजता

बेलबाग चौक: 10.15 वाजता

कुंटे चौक: ११.४५ वाजता

विजय टॉकीज चौक: १.४० वाजता

टिळक चौक: २.४५ वाजता

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.४५ वाजता

बेलबाग चौक: १०.३० वाजता

कुंटे चौक: १२ वाजता

विजय टॉकीज चौक: १.५५ वाजता

टिळक चौक: ३ वाजता

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १० वाजता

बेलबाग चौक: ११ वाजता

कुंटे चौक: १२.४५ वाजता

विजय टॉकीज चौक: २.३० वाजता

टिळक चौक: ३.३० वाजता

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.१५ वाजता

बेलबाग चौक: ११.३० वाजता

कुंटे चौक: १.३० वाजता

विजय टॉकीज चौक: ३ वाजता

टिळक चौक: ४ वाजता

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.३० वाजता

बेलबाग चौक: १२ वाजता

कुंटे चौक: २ वाजता

विजय टॉकीज चौक: ३.३० वाजता

टिळक चौक: ४.३० वाजता

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

बेलबाग चौक (सुरुवात): ४ वाजता

गणपती चौक: ४.५५ वाजता

कुंटे चौक: ६ वाजता

विजय टॉकीज चौक: ६.३० वाजता

टिळक चौक: ७.३० वाजता

अखिल मंडई मंडळ

बेलबाग चौक (सुरुवात): ७ वाजता

गणपती चौक: ७.२५ वाजता

कुंटे चौक: ८.३० वाजता

विजय टॉकीज चौक: ९.२० वाजता

टिळक चौक: ११.२५ वाजता

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट

बेलबाग चौक (सुरुवात): ६.३० वाजता

गणपती चौक: ६.५५ वाजता

कुंटे चौक: ८ वाजता

विजय टॉकीज चौक: ९.४० वाजता

टिळक चौक: १०.४५ वाजता

हेही वाचा :