Bhiwandi Fire Accident : भिवंडी शहरातील नारपोली परिसरात बालाजी डाईंग या दोन मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली. आगीच्या प्रचंड ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली असून परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. अलीकडच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात वारंवार लागणाऱ्या आगींमुळे या घटना अपघाती आहेत की मुद्दाम घडवल्या जातात, असा प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे.

Continues below advertisement


सातत्याने लागणाऱ्या आगी लागतात की लावल्या जातात?


मिळालेल्या माहितीनुसार, डाईंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांचा साठा असल्याने आग काही क्षणांतच विक्राळ झाली. अग्निशामक दलाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तसेच नारपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगीचे कारण अजूनही समजू शकले नसले तरी आग इतकी भीषण आहे की तीन ते चार किलोमीटरपर्यंत धुराचे लो पाहिले जात आहे. या आगीने संपूर्ण डाईंग कंपनीला आपल्या भक्षस्थानी पाडले असून कंपनीमध्ये संपूर्ण कच्चा कपडा जळून खाक झाला आहे. या आगी वरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे हे अजूनही सांगता येत नाही. मात्र भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये सातत्याने लागणारा या आगी लागतात की लावल्या जातात असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.


ईद मिरवणुकीत हाताच्या दंडावर पॅलेस्टाईनचे झेंडे, पोलिसांची कारवाई


 ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत नागपूरात धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण पॅलेस्टाईनचे झेंडे हाताच्या दंडावर बांधत मिरवणुकीत दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. तिन्ही तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता मिरवणुकीच्या दरम्यान एका चौकावर हाताच्या दंडावर बांधता येईल अशा आकाराचे पॅलेस्टाइनचे झेंडे वाटण्यात आल्याची माहिती तरुणांनी दिली. हे झेंडे त्यांना कोणी दिले याची नेमकी माहिती या तरुणांनी पोलिसांना दिली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या