गडचिरोली : राज्यातील माओवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे. देशातील क्रमांक दोनच्या माओवादी कमांडरच्या पत्नीने आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली पोलीस मुख्यालयात टॉप माओवादी कमांडरने आत्मसमर्पण केलं आहे. विशेष बाब म्हणजे आज आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी कमांडर असल्याने माओवाद्यांची चळवळ अधिक खिळखिळी झाली आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सी-60 जवानांचा सत्कार सोहळा आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे. गडचिरोलीच्या सी-60 च्या अधिकारी आणि जवानांसोबत घालवता आला. अनेक कार्यक्रम पार पाडता आले. अहेरी ते गरदेवाडा बस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावत आहे. त्या बसचं उद्घाटन आपण केलं. पेनगुंडाला नवीन आऊटपोस्ट सुरु केलं. कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं, यामुळं गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, असा विश्वासही  फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे.


कोटींच्या रकमेचे बक्षीस असलेले माओवाद्यांचं आत्मसमर्पण


तारक्का उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ विमला सिडाम ही आत्मसमर्पण करत आहे. तारक्का स्वतः दक्षिण गडचिरोली मधली मोठी माओवादी कमांडर तर आहेच, सोबतच ती माओवाद्यांच्या देशभरातील फळीमधील विद्यमान नंबर दोन आणि सेंट्रल कमिटी तसेच पोलित ब्युरो मेंबर (माओवाद्यांची सर्वात मोठी निर्णय करणारी यंत्रणा) भूपती उर्फ सोनू उर्फ मल्लोजूला वेणुगोपाल याची पत्नी आहे. म्हणजेच माओवाद्यांच्या रेंटिंग मध्ये देशभरात जो नंबर दोनवरचा माओवादी कमांडर आहे, त्याची ती पत्नी आहे. 


तारक्का शिवाय आज आणखी 11 माओवादी कमांडर आणि कॅडर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत आहे. या सर्व आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी कमांडर यांच्यावर एकूण 1 कोटी पेक्षा जास्त रकमेचे बक्षीस होते.


कोण आहे तारक्का?  


* १९८६ पासून नक्षल चळवळीत सक्रिय महिला...
* अगदी सामान्य नक्षलवादी पासून दक्षिण गडचिरोली ची प्रमुख महिला कमांडर DKZC पर्यंत तारक्का ची नक्षल चळवळीत बढती झाली..
* तारक्का ने आजवर पोलिसांवर अनेक हल्ले करून मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षदलांचे नुकसान घडविले...
* १९९१ चा ताडगाव ब्लास्ट ,(१० srpf जवान शहीद), १९९४ अहेरी ब्लास्ट (५ पोलीस शहीद), या शिवाय २००८ चे मरकेगाव, मुंगेर, हत्तीगोटा ब्लास्ट त्या शिवाय २००९ च्या लाहेरी ब्लास्ट (१८ पोलीस शहीद) मध्ये तारक्का चा समावेश होता...
* तारक्का ने आपल्या सक्रियतेच्या काळात अहेरी, पेरीमिली, भामरागड आणि बिनागुंडा अशा वेगवेगळ्या दलम चे नेतृत्व त्यानी केले आहे..


इतर महत्वाच्या बातम्या