मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणतांब्यातील शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी किसान क्रांती शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाटाघाटी झाल्या. मात्र चर्चेने समाधान झालं नाही. कर्जमाफीची मागणी कायम ठेवली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, मात्र त्याने समाधान झालेलं नाही. त्यामुळे 1 जूनपासून शेतकरी संपावर जातील. गावात जाऊन त्याची तयारी करु, अशी माहिती शेतकऱ्यांनी बैठकीनंतर दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. 3 एप्रिल रोजी घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटले.

सुरुवातीला अहमदनगर आणि औरंगाबाद येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत या आंदोलनाची दिशा ठरवली आणि राज्यभरातील अनेक शेतकरी या संपात सहभागी होणार, असं चित्र निर्माण झालं. यासाठीच राज्यव्यापी अशा किसान क्रांतीच्या माध्यमातून संघटनेची स्थापनाही करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपाचा इशारा


शेतकऱ्यांच्या प्रस्तावित संपात उभी फूट, एका गटाची माघार


राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडतंय: शिवसेना


एक जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार!