निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
सचिनच्या बायोपिकचं वायुदलासाठी स्पेशल स्क्रीनिंग
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2017 08:18 AM (IST)

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' चित्रपटाचं भारतीय वायुदलातल्या अधिकाऱ्यांसाठी स्पेशल स्क्रीनिंग शोचं आयोजन केलं. सेलिब्रिटी स्टार त्यांच्या नव्या चित्रपटाचं पहिलं स्क्रीनिंग शो बॉलिवूडमधील स्टार्ससाठी करतात. मात्र सचिनने यावेळीही त्याची संवेदनशीलता जपत त्याच्या चित्रपटाचं पहिलं स्क्रीनिंग हवाई दलातल्या अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केलं. https://twitter.com/sachin_rt/status/865971615519166465 चित्रपट करायचं ठरवलं, त्याच दिवशी निश्चय केला होती की, या चित्रपटाचं पहिलं स्क्रीनिंग वायुदलासाठी करायचं, असं सचिनने स्क्रीनिंगनंतर सांगितलं. चित्रपट अप्रतिम आहे. सचिनचं करिअर जवळून पाहिलं असून ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हा चित्रपट 26 मे रोजी रिलीज केला जातोय, याच दिवशी कारगीलमध्ये एअर ऑपरेशन्स सुरु करण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया वायुदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली. सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सचिनच्या हस्ते या सिनेमातील दुसरं गाण रिलीज करण्यात आलं होतं. तर सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. पाहा व्हिडिओ :