कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 10:35 AM (IST)
तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं?
मुंबई: शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती. हे अर्ज भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. काहींचे आधार कार्डचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत नाही. अनेक शेतकरी सुविधा केंद्राच्या रांगेत उभं राहून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं? असा प्रश्न असेल, तर त्यासाठी सोपा मार्ग आहे.