नवी दिल्ली : ईपीएफच्या 2020-21 व्याज दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ईपीएफचा व्याज दर 8.5 टक्के निश्चित करण्यात आला आहे. 2019-20 मध्ये व्याज दर समान होता. श्रीनगर येथे झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने ईपीएफवरील व्याज दर 2019-20 साठी 8.50 टक्के करण्याची शिफारस केली होती. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कामगार मंत्री संतोष गंगवार आहेत. यापूर्वी सन 2018-19 या वर्षात ईपीएफ खातेदारांना त्यांच्या जमा केलेल्या रकमेवर 8.65 टक्के व्याज मिळाले होते.


अशी शक्यता वर्तविली जात आहे की ईपीएफओ या आर्थिक वर्षात (2020-21) भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 2019-20 8.5.% पेक्षाही कमी करेल. कोरोनो व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधीतून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्या गेलेल्या सदस्यांनी दिलेली कमी रक्कम आणि व्याजदर यामुळे व्याजदरात कपात झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता.


मागील वर्षी मार्चमध्ये, ईपीएफओने सन 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर सात वर्षांच्या नीचांकावर म्हणजेच 8.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे, मागील वर्ष 2018-19 मध्ये हा दर 8.65 टक्के होता. ईपीएफने (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) 2019-20 साठी दिलेला 8.5 टक्के व्याज दर हा 2012-13 नंतर सर्वात कमी होता.


ईपीएफओने 2016-17 मध्ये आपल्या ग्राहकांना 8.65 टक्के व्याज दिले होते तर 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याज दिले होते. यापूर्वी 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्क्यांपेक्षा किंचित जास्त होता.


2013-14 मध्ये तसेच 2013-15 मध्ये 8.75 टक्के व्याज दिले, जे 2013-13 मध्ये 8.5 टक्क्यांपेक्षा जास्त होते. यापूर्वी ईपीएफओने 2011-12 मध्ये भविष्य निर्वाह निधीवर 8.25 टक्के व्याज दिले होते.