Emergency Landing at Nagpur Airport : नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून  (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात कोच्चीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने नागपूरमध्ये अचानक इमर्जन्सी लँडिंग केलं आहे. विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे कॉल आल्यानंतर नागपुरात विमानाचे लँडिंग करवण्यात आलं आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता सध्या विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे एअरपोर्टवर काही वेळ एकच पळापळ आणि गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले आहे.  

पुढे आलेल्या माहितीनुसार, गेल्या वीस मिनिटापूर्वी विमान नागपूर विमानतळावर उतरलं आहे. तपासादरम्यान अजूनपर्यंत काहीही धोकादायक वस्तू आढळलेली नाही. मात्र पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ते कसून तपास सध्या करत आहे. 

पोलीस आणि अग्निशमन पथकाकडून कसून तपास सुरू

पुढे आलेल्या माहितीनुसार, हे विमान सकाळी 9.20 वाजता कोचीहून निघालेले आणि दुपारी 12.35 वाजता दिल्लीत उतरणारे होतं. अशातच विमानातील अधिकाऱ्यांना धोकादायक इशारा मिळाल्यानंतर हे विमान नागपूरला वळवण्यात आले. कोची विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या धोक्याची पुष्टी केली, ज्यामुळे आपत्कालीन प्रोटोकॉल वाढवण्यात आले आणि सुरक्षा एजन्सींशी तात्काळ समन्वय साधण्यात आला. दरम्यान, विमानाचे लँडिंग होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तातडीने विमानातून बाहेर काढले. तर बॉम्बशोधक पथकाने विमानाची कसून तपासणी केली. सध्याघडीला जरी अधिकाऱ्यांनी याबाबतचा अधिक तपशील उघड केलेला नसला तरी या नुकतीची गुजरातच्या विमान दुर्घटनेनंतर अशा धमकीच्या फोन ने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

181 इमारतीकडून नागपूर विमानतळ वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका?

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विमान वाहतुकीच्या सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, सुरक्षित विमान वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या उंचीच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या181 इमारती ओळखल्या गेल्या आहेत. विमानतळाच्या 25  किलोमीटरच्या परिघात असलेल्या या इमारतींना अडथळे म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निष्कर्ष असूनही, कोणतेही महत्त्वपूर्ण सुधारणात्मक उपाय लागू केलेले नाहीत. या परिस्थितीमुळे विमान वाहतूक सुरक्षा तज्ञांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, ते इशारा देतात की अशा अनधिकृत संरचनांची सतत उपस्थिती उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे यावर विमानतळ प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

एअर इंडियाचे लंडन-अहमदाबाद उड्डाण आज रद्द; नेमकं कारण काय?

अहमदाबाद एआय 172 विमान अपघातानंतर, एअर इंडियाची लंडन-अहमदाबाद सेवा आजपासून सुरू होणार होती. अहमदाबाद-लंडन विमान एआय 171  ऐवजी नवीन कॉल साइन एआय 159 ने चालवले जाणार होते. पण आजची उड्डाण रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारण असल्याने ही विमानसेवा आज रद्द करण्यात आल्याचे सांगितली जात आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या