Elon Musk on X Cyber Attack: अमेरिकेच्या DOGE विभागाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी दावा केला आहे की, त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) वर युक्रेनमधून सायबर हल्ला झाला. त्यामुळे सोमवारी (10 मार्च 2025) जगभरात X सर्व्हर डाउन झाले. तसेच X चे सर्व्हर अनेक वेळा डाऊन झालं आणि वेळोवेळी ते ठीक देखील झालं, परंतु नंतर ते पुन्हा क्रॅश झाल्याचा दावा इलॉन मस्क यांनी केलाय.
फॉक्स न्यूजशी बोलताना एलोन मस्क म्हणाले, 'नक्की काय घडले हे आम्हाला माहित नाही, परंतु X सर्व्हर डाउन करण्यासाठी युक्रेन प्रदेशातील आयपी पत्त्याचा (IP Address) वापर करून सायबर हल्ला करण्यात आला.'जेव्हा एक्सच्या स्थितीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की आता पूर्णपणे ठीक आहे.
मस्क यांनी व्यक्त केली होती काही देशांचा सहभाग असल्याची भीती
याआधी एक्स पोस्टवरही एलोन मस्क यांनी सायबर हल्ल्यात काही धोकादायक गट किंवा काही देश सामील असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले होते की, 'एक्सवर सायबर हल्ला झाला आहे. X वर दररोज सायबर हल्ले केले जात आहेत, परंतु यावेळी X ला मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. हे काही धोकादायक गटाचे काम आहे की काही देशही यात सामील आहेत? त्याची पडताळणी केली जात आहे.'
स्टारलिंकच्या संदर्भात जेलेंस्कीने दिली होती धमकी
इलॉन मस्क यांनी सायबर हल्ल्याबाबत हा दावा केला आहे की, जेव्हा त्यांनी अलीकडेच स्टारलिंकबद्दल सांगितले होते की माझ्याशिवाय युक्रेनची फ्रंटलाइन कोसळेल. मात्र, ते थांबवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी वाद घातल्याबद्दल इलॉन मस्क यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवरही हल्ला चढवला होता.
झेलेन्स्की हा हुकूमशहा - एलोन मस्क
एलोन मस्क यांनी रशिया युद्धाबाबत युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्यावर वारंवार टीका केली आहे. मस्क यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे हुकूमशहा असे वर्णन केले होते आणि ते म्हणाले की त्यांना माहित आहे की ते निवडणुकीत वाईटरित्या हरतील, म्हणून त्यांनी निवडणूक रद्द केली. खरं तर, युक्रेनचे लोक झेलेन्स्कीचा द्वेष करतात. त्याने पुराव्याशिवाय झेलेन्स्कीवर युक्रेनियन सैनिकांच्या मृतदेहांपासून पैसे कमावणारे भ्रष्टाचाराचे मोठे मशीन चालवल्याचा आरोप केला.
हे ही वाचा