Eknath Khadse on Girish Mahajan : हनी ट्रॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल लोढावरुन (Praful Lodha) भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अशातच गिरीश महाजन यांच्या अनेक सीडीज (CD) या प्रफुल लोढाकडे असल्याचा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. शिवाय मला कशाला आंदोलन करून जोडे मारता? त्या गिरीश महाजनांना जोडे मारा, प्रफुल लोढाला जोडे मारा. माझ्या विरोधात भाजपचे लोक आंदोलन करताय. त्यातला एका पदाधिकाऱ्याला मी विचारले काय रे कशाला आंदोलन केले. तर तो म्हणाला, वरून आदेश आले म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं. विषारी पिल्लांना मी मोठं केलंय, याचे मला दुःख वाटतंय अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केलंय.

Continues below advertisement

मी कधीही माझ्या जावईचं समर्थन केलेलं नाही, पण....

दरम्यान, एकनाथ खडसे यांचे जावईच पुण्यामध्ये रेव्ह पार्टी करताना रंगेहाथ सापडल्याने राज्यामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यामध्ये रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाबाबत आता अधिक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले कि, मी कधीही माझ्या जावईचं समर्थन केलेलं नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? तरीदेखील रूपाली चाकणकर या कुणाच्या आधारावर बोलताय? माझं नाव त्या सतत का घेताय? तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का? की तो काय करतोय, दारू पितोय का कि अजून काही करतोय ते? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनीट्रॅपवरून लक्ष विचलित करून हे उद्योग सध्या सुरू आहे. असे म्हणत एकनाथ खडसे यांनी अनेक सवाल रूपाली चाकणकर यांना विचारले आहे.

तुमचे मंत्री अडकलेले आहेत त्याची तुम्हाला भीती आहे का?- एकनाथ खडसे

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले कि, काही हि झालं तरी मी प्रफुल लोढाच्या संदर्भातला विषय सोडणार नाही. प्रांजल खेवलकर या प्रकरणात पुण्यातील पोलीस तोंडघशी पडली आहे. लोढाकडे कोणत्या व्हिडिओ क्लिप आहेत, मुलीच्या त्या तपासा, कोणत्या मंत्र्याच्या सीडी आहेत तेहि तपासा. नाशिकच्या हनीट्रॅपमध्ये 72 अधिकारी आणि चार मंत्री आहेत. याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी. ही मागणी मी नाही करत आहे. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. आणि त्या प्रकरणात तुमचे मंत्री अडकलेले आहेत त्याची तुम्हाला भीती आहे का? असा सवाल हि त्यांनी केला आहे.

Continues below advertisement

 

हेदेखील वाचा