शीतल आमटे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकला एक पेंटिंग शेअर केली आहे. त्यांनी स्वत: हे पेंटिंग काढलं होतं. त्यांचं नाव आणि 29 नोव्हेंबर ही तारीखही या पेंटिंगवर आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी 'War and Peace' असं कॅप्शन दिलं आहे. मात्र त्यांच्या जाण्याने आता या पेंटिंगचा नेमका अर्थ काय असा प्रश्न सर्वांना पडलाय.
डॉ. शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात पोस्टमॉर्टमसाठी दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम होणार आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Sheetal Amte | डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? सांगणाऱ्या शीतल आमटे; आत्महत्येनं महाराष्ट्रात खळबळ
शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या आहेत. आनंदवनच्या संचालनातील अधिकारपदावरून आमटे कुटुंबियात गेले काही महिने वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी फेसबुक व्हिडीओ पोस्ट टाकून डॉक्टर शीतल आमटे यांनी काही कार्यकर्त्यांविरुद्ध आर्थिक अपहाराचे आरोप केले होते. तर आमटे कुटुंबियांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत या आरोपांचा इन्कार केला होता. पत्रकात शीतल आमटे मानसिक उपचार घेत असल्याचा दावा केला होता.
Majha Vlog | डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? डॉ. शीतल आमटे यांची आर्ट थेरपी | ABP Majha
Majha Vlog | मुलांचे स्क्रीन अॅडिक्शन कसे सोडवावे ? डॉ. शीतल आमटे यांचा मोलाचा सल्ला | ABP Majha
VLOG Sheetal Amte | 'आनंदवना'तील कृत्रिमरित्या जंगल निर्मितीचा प्रयोग | ABP Majha