नागपूर : जिल्हास्तरीय कृषी दिनाचा कार्यक्रम कळमेश्वर येथील आयरिश फार्म येथे जिल्हा परिषदच्या कृषी विभाग, पंचायत समिती कळमेश्वर तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी विमला आर, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे, जिल्हा परिषद सदस्य पिंकी कौरती, महेंद्र डोंगरे, , उपविभागीय कृषी अधिकारी अरुण कुसळकर, जिल्हा कृषी अधिकारी मिलींद शेंडे, तहसीलदार सचिन यादव, गट विकास अधिकारी महेश्वर डोंगरे, तालुका कृषी अधिकारी राकेश वसु, कृषी विस्तार अधिकारी नंदकिशोर खंडाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कृषी विभागातर्फे पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी सुनंदा सालोटकर, सुनील कोंडे, निळकंठ कोढे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉ. संगीता भट्टाचार्य, डॉ. बिपिन महल्ले यांनी संत्रा पिकाबाबत विस्तृत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे शंका समाधान केले. त्याचप्रमाणे गंगा कावेरी सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक गोपाल भक्ते यांनी संत्रा पिकाचे किड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन कृषी अधिकारी रवी राठोड तर आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी दीपक जंगले यांनी केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे कृषि संजिवनी मोहिमेची सांगता
नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डीमार्फत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सारीपुत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर तालुक्यातील मौजा पाटणसावंगी येथे 'कृषि दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून रोशनी ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. अश्विनी गायधनी (उद्यानविद्या), मयुरी ठोंबरे (गृह विज्ञान), प्रताप साबळे, कापूस उत्पादक तज्ञ आणि तुलसीदास पाटील हे उपस्थित होते.डॉ. अश्विनी गायधनी यांनी फळबाग व फुलबाग लागवड या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मयुरी ठोंबरे यांनी लघुउद्योग स्थापन आणि उत्पादन विक्री यावर शेतकऱ्यांना संबोधन केले. कृषि पर्यवेक्षक रोशन डंभारे यांनी शेतकऱ्यांना विविध कृषि योजनांची माहिती दिली. प्रताप पाटील यांनी कापूस पिकातील बारकावे शेतकऱ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे भूषण भक्ते, स्मिता सावरकर आणि कृषि विभागाचे रोशन डंभारे आणि अनिल खरपुरिये यांनी परिश्रम घेतले.